पाणी साचले, वाहतूक ठप्प…

June 16, 2010 2:12 PM0 commentsViews: 4

16 जून

आज दिवसभर मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस पडत आहे. या पावसाने महापालिकेचा दावा फोल ठरवला.

अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. विशेष म्हणजे दरवर्षी ज्या भागांमध्ये पाणी साचते तिथे या वर्षी पुन्हा पाणी साचले.

पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत झाली होती.

दादर माहीम दरम्यान ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने स्लो मार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती.

त्यानंतर वाहतूक सुरू झाली, पण गाड्या अर्धा तास उशिराने सुरू झाल्या. यामुळे नोकरदार मुंबईकरांचे हाल झाले.

close