खते न मिळाल्याने नांदेडमध्ये दगडफेक

June 16, 2010 2:20 PM0 commentsViews: 3

16 जून

मराठवाड्यात ऐन पेरणीच्या तोंडावर खतांची टंचाई जाणवत आहे. आज नांदेडमध्ये खतांच्या तीव्र टंचाईमुळे शेतकर्‍यांच्या संयमाचा भडका उडाला.

खतासाठी जादा पैसे मोजूनही खत उपलब्ध होत नाही, म्हणून संतापलेल्या शेतकर्‍यांनी शहरातील नवामोंढा बाजारपेठेत जोरदार दगडफेक केली.

या दगडफेकीमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बराच काळ बाजारपेठ बंद होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस, कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी संतप्त शेतकर्‍यांची समजूत घालवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे खतटंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे.

close