राज्यात पावसाचे 46 बळी

June 16, 2010 2:29 PM0 commentsViews: 6

16 जून

राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्यभरात बळी गेलेल्यांची संख्या 46 वर गेली आहे. तर 600 घरांचे नुकसान झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

ठाण्यात भिंत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाख रूपयांची मदत देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

राज्यात आतापर्यंत सरासरी 260 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मुंबईतील पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. साचलेले पावसाचे पाणी उपसण्यासाठी मुंबईत 50 पंप कार्यरत आहेत.

भांडुप, कुर्ला आणि अंधेरीत डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या तीन टीम सज्ज आहेत. त्यांच्यासह नेव्हीच्याही नऊ टीम सज्ज असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

close