शिक्षण सेवक भरतीबाबत मतभेद

June 16, 2010 3:04 PM0 commentsViews: 2

16 जून

राज्यातील शिक्षण सेवकांच्या भरतीबाबत मंत्रिमंडळात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षणमंत्र्यांनी आग्रह धरल्यामुळेच राज्यातील शिक्षण सेवक भरती थांबवल्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.

त्या-त्या विभागातील भरती त्याच विभागात झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी ही स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहितीही राणेंनी दिली.

पण शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र याबाबत कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे म्हटले आहे. उद्या अधिकार्‍यांच्या बैठकीत याविषयी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यातून मंत्रिमंडळातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे सिद्ध झाले आहे.

close