बॅनर लावल्यास गुन्हे दाखल करा…

June 16, 2010 3:29 PM0 commentsViews: 2

16 जून

सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी पोस्टर्स, बॅनर्स किंवा अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍यांविरूध्द महापालिका आणि पोलीस आयुक्तांनीच गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

या प्रकरणी कोर्टाने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिल्यामुळे हा आदेश आता राज्यभर लागू होऊ शकतो, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

त्यामुळे यापुढील काळात राजकीय नेत्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्टर्समुळे शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी थेट पोलिसांकडूनच गुन्हे दाखल होऊ शकतात.

सुनील पंढरीनाथ जाधव यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती.

close