…तर अर्धी शहरे ओस पडतील!

June 16, 2010 3:44 PM0 commentsViews:

16 जून

राज्यातील पूरनियंत्रण रेषांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. पण त्याविरोधात कारवाई केली, तर अनेक शहरे अर्धी ओस पडतील, अशी कबुली खुद्द उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

बड्या महानगरपालिकांमध्ये पूर नियंत्रण रेषेचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसत आहे. बिल्डर्स आणि स्थानिक राज्यकर्ते किंवा पुढारी यांच्या सहभागातून पूर नियंत्रण रेषेचे उल्लंघन होत आहे.

पूर नियंत्रण रेषेचा नियम पाळला तर शहरांमधील अर्धी बांधकामे पाडावी लागतील, असे भुजबळ म्हणाले. परंतू यापुढे महापालिकांनी पूर नियंत्रण रेषेचा नियम काटेकोरपणे पाळावा, असेही ते म्हणाले.

close