दहावीचा निकाल 78.72 टक्के

June 17, 2010 9:32 AM0 commentsViews: 108

17 जून

आज दहावीचा निकाल जाहीर झाला असून संपूर्ण राज्याचा निकाल 78.72 टक्के लागला आहे.

विभागवार निकालानुसार अमरावती विभाग अव्वल ठरला आहे.

त्याखालोखाल नाशिक आणि पुण्याच्या विद्यार्थ्यांनी चमक दाखवली आहे. मुंबईने यंदाही चांगली बाजी मारली आहे.

आता नजर टाकूया राज्यातील विभागवार निकालावर…

पुणे – 83.94

नागपूर – 78.64

कोल्हापूर – 79.75

अमरावती – 86.16

नाशिक – 84.90

लातूर – 44.48

औरंगाबाद – 71.68

मुंबई – 81,17

मुंबईचा निकाल 81.17 टक्के

मुंबई बोर्डाचा निकाल 81.17 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईचा निकाल 3 टक्क्यांनी वाढला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेला मुंबई बोर्डातून 16 लाख 17 हजार 258 विद्यार्थी बसले होते. त्यातील 12 लाख 73 हजार 29 विद्यार्थी पास झाले.

मुंबईत यंदा मुलांनी बाजी मारली. 6 लाख 84 हजार 30 मुले उत्तीर्ण झाली तर पास झालेल्या मुलींची संख्या आहे, 5 लाख 88 हजार 999.

कोल्हापूरच्या निकालात वाढ

कोल्हापूर बोर्डाचा निकाल 79.75 टक्के इतका लागला असून यावर्षी त्यात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेला कोल्हापूर विभागातून 1 लाख 98 हजार 393 विद्यार्थी बसले होते. त्यातील 1 लाख 58 हजार 547 विद्यार्थी पास झाले.

गणित विषयामुळे बोर्डाची टक्केवारी कमी झाली आहे. मात्र यंदा कोल्हापूर बोर्डात 87.50 टक्के इतक्या प्रमाणात उत्तीर्ण होत मुलींनी बाजी मारली.

निकाल पुढील वेबसाईट्सवर पाहता येईल…

http://mha result. nic . in

www.rediff .com /exams

www.study ssc online . com

www.mh ssc .ac . in

ssc result . mkcl . org

close