हिरानंदानी वीज प्रकल्पाला स्थगिती

June 17, 2010 9:52 AM0 commentsViews: 1

17 जून

तळेगाव दाभाडे येथील प्रस्तावित हिरानंदानी वीज प्रकल्पाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे.

पर्यावरण संदर्भातील हरकतींमुळे मुंबई हायकोर्टाने ही स्थगिती दिली आहे.

गावकर्‍यांच्या विरोधाला न जुमानता या प्रकल्पाचे काम जोरात सुरू होते. पण अशा प्रकारे काम करणे ही सरकारची दडपशाही असल्याचे म्हणत या परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, असे आंदोलकांचे म्हणणे होते. हा विरोध लक्षात घेता हायकोर्टाने कंपनीला फक्त कम्पाऊंड वॉल बांधण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान परिसरातील सर्व शाळा चौथ्या दिवशीही बंद आहेत.

close