मिडोरी टॉवरचे चार मजले पाडण्याचे आदेश

June 17, 2010 10:08 AM0 commentsViews: 1

17 जून

पुण्यातील पिंपरी महानगरपालिकेच्या हद्दीतील वादग्रस्त मिडोरी टॉवरचे अनधिकृत चार मजले पाडण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे.

येत्या महिन्याभरात स्वतःहून हे बांधकाम पाडले नाही, तर महापालिका बांधकाम पाडून टाकेल आणि खर्च वसूल करेल, असे या नोटीशीत म्हटले आहे.

पिंपळे निलख येथील मुठा नदीच्या पात्रातील पूररेषेचे उल्लंघन करून हा टॉवर उभारला गेल्याचे 'आयबीएन-लोकमत'ने उघड केले. त्यानंतर पालिकेने ही नोटीस बजावली.

मुळात मिडोरी टॉवरला फक्त आठच मजल्यांची परवानगी असताना 12 मजल्यांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर या अनिधिकृत बांधकामाची पहाणी करुन पालिकेने विक्रम डेव्हलपर्सच्या विक्रम गायकवाड यांना ही नोटीस बजावली गेली आहे.

close