सामूहिक कॉपीची फाईल गहाळ

June 17, 2010 12:36 PM0 commentsViews: 3

17 जून

नांदेड जिल्ह्यात झालेल्या मास कॉपी प्रकरणाची तयार केलेली फाईलच आता गहाळ झाली आहे. दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला होता.

आता हीच फाईल लातूर बोर्डातून चोरीला गेली आहे. गेल्या वर्षी 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत नांदेडमधील 13 संस्थांमध्ये 3 हजार 561 विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचे उघड झाले होते.

यापैकी दोषी आढळलेल्या 945 विद्यार्थ्यांवर बोर्डाने तातडीने कारवाई केली. या प्रकरणात दोषी आढळलेल्या 75 कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे या अहवालात सूचित करण्यात आले होते.

ही फाईल कोणाच्या टेबलावरून चोरीला गेली, हेच बोर्डाच्या सचिवांना माहित नाही.

close