‘आंग्रे यांना अडकवले जात आहे’

June 17, 2010 1:13 PM0 commentsViews: 1

17 जून

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे हे रवींद्र आंग्रे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आंग्रे यांच्या पत्नी धनश्री यांनी केला आहे. तसेच ठाण्यातील पोलीस शिंदेंच्या दबावाखाली काम करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक महेश वाघ यांच्यावरील गोळीबार प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी रवींद्र आंग्रे यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याआधीही ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक गणेश वाघ यांना धमकी दिल्याप्रकरणी रवींद्र आंग्रे यांना आधी अटक करण्यात आली होती. तब्बल एक वर्ष तुरूंगात काढल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आता पुन्हा आंग्रेंना अटक करण्यात आली आहे.

या सार्‍या प्रकरणामागे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे असल्याचा आरोप रवींद्र आंग्रे यांनीही केला आहे.

close