मंत्रालयात नव्या स्कॅनिंग मशीन आणणार

June 17, 2010 2:42 PM0 commentsViews: 4

17 जून

मंत्रालयातील 10 पैकी 9 स्कॅनिंग मशिन बंद असल्याची बातमी 'आयबीएन-लोकमत'ने दाखवली. आमच्या या दणक्यानंतर सुरक्षेबाबत झोपलेले मंत्रालय प्रशासन खडबडून जागे झाले. 5 ते 6 दिवसात नव्या स्कॅनिंग मशिन्स आणल्या जातील, असे आश्वासन आता प्रशासनाने दिले आहे.

मंत्रालय सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय मिस्त्री यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने एका परदेशी कंपनीकडून 10 एक्सरे स्कॅनिंग मशीन विकत घेतल्या आहेत. त्यापैकी एकूण 6 मशीन्स या मंत्रालयातील मुख्य इमारतीत तर 3 मशीन्स या मंत्रालयातील एक्सटेंशन इमारतीत लावण्यात आल्या आहेत.

1 मशिन नवीन प्रशासकीय इमारतीत लावण्यात आली आहे. या 10 पैकी केवळ 1 मशिन जी मुख्य इमारतीच्या गेट नंबर 6 वर बसवण्यात आली आहे. आता फक्त तीच सुरू आहे.

ECIL RATISCAN या कंपनीकडून सरकारने 10 एक्सरे मशीन घेतल्या आहेत. आणि आता सरकारने नवीन मशीन आणण्याचे ठरवले आहे.

close