मनसे आमदारांवरून भाजप मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार

June 17, 2010 2:56 PM0 commentsViews: 1

17 जून

मनसे आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या मुद्यावरुन भाजप मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे.

येत्या पावसाळी अधिवेशनात हा हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत आणला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

त्याचसोबत विधीमंडळातील ठरावाचा वापर मनसेला ब्लॅकमेल करून मते मिळवण्यासाठी केल्याबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर भाजपने जोरदार टीका केली आहे.

close