अर्जेंटीनाकडून द. कोरियाचा पराभव

June 17, 2010 3:13 PM0 commentsViews: 1

17 जून

फूटबॉल वर्ल्डकपमध्ये आज पहिल्या मॅचमध्ये बलाढ्य अर्जेंटीनाने दक्षिण कोरियाचा 4-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.

मॅचचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच गोलची हॅटट्रिक पाहायला मिळाली. अर्जेंटीनाच्या हेग्वीनने तीन गोल करत ही कामगिरी केली आहे.

त्याचसोबत बाद फेरीत पोहचणारी अर्जेंटीना ही पहिली टीम ठरली आहे. अर्जेंटीनाच्या टीमने आपला धडाकेबाज खेळ सुरू ठेवत पहिल्या हाफ पर्यंत मॅचमध्ये 2-1 ने आघाडी घेतली.

दक्षिण कोरियाने दडपणाखाली खेळत 17 व्या मिनिटालाच सेल्फ गोल केला. तर त्यानंतर 33व्या मिनिटाला हिग्वेनने टीमसाठी पहिला गोल केला.

त्यानंतर दुसर्‍या हाफमध्येही अर्जेंटीनाचे आक्रमण सुरुच राहिले. आणि 76 व्या मिनिटाला पुन्हा एकदा कोरियाचा बचाव भेदत हेग्वीनने दुसरा गोल केला.

नंतर लगेचच 80 व्या मिनिटाला त्याने तिसरा गोल करत यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिली हॅटट्रीक नोंदवली. 2002 नंतरची ही पहिलीच हॅटट्रीक ठरली आहे.

close