भोपाळ प्रकरणी आता नरसिंह रावांचे नाव…

June 17, 2010 3:27 PM0 commentsViews: 1

17 जून

भोपाळ गॅस दुर्घटनेप्रकरणी रोज नवे नवे खुलासे होत आहेत. आता तर त्या वेळचे परराष्ट्र सचिव एम. के. रसगोत्र यांनीच एक गौप्यस्फोट केला आहे. आणि त्यांनी नाव घेतले आहे, तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांचे…

भोपाळ गॅस दुर्घटनेतील मुख्य आरोपी वॉरेन अँडरसनला भारताबाहेर सुरक्षितपणे जाऊ दिले जावे, हा आदेश गृहमंत्री नरसिंह राव यांनी दिला. आणि पंतप्रधान राजीव गांधी यांनी नंतर तो मान्य केला, असे रसगोत्र यांनी स्पष्ट केले आहे.

अँडरसन नाट्यात सहभागी असलेल्या एखाद्या व्यक्तीने बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे.

close