भोपाळ दुर्घटना समितीचा अहवाल सादर

June 17, 2010 3:39 PM0 commentsViews: 106

17 जून

भोपाळ गॅस दुर्घटनेप्रकरणी कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निकालाबाबत मध्यप्रदेश सरकारने पाच सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल आज सादर केला.

या समितीने केलेल्या शिफारसी पुढीलप्रमाणे ..

गॅस दुर्घटनेप्रकरणी सरकारने सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका दाखल करावी

गॅस दुर्घटनेतील आणखी एक आरोपी केशुब मेहताबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती करावी

मेहता हा युनियन कार्बाईडचा तत्कालीन नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन होता

गॅस पीडितांना आणखी नुकसान भरपाई मिळावी यासाठी विनंती करण्यात यावी

अँडरसन आणि इतर आरोपींना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे जॉईंट टास्क फोर्स स्थापन करण्याची विनंती करावी

भोपाळच्या ट्रायल कोर्टाने 7 जून रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सरकारने पुढच्या कोर्टात याचिका दाखल करावी, अशीही समितीची इच्छा आहे

close