पोलिसांना घरे देण्याचे आदेश

June 17, 2010 5:56 PM0 commentsViews: 3

17 जून

मुंबईतील प्रतिक्षानगर इथे पोलिसांना स्वत:चे हक्काचे घर मिळेल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे.

मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला पोलिसांसाठी 300 घरे विकत घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

खरे तर 2005 मध्येच सेवेत असणार्‍या मुंबई पोलिसांसाठी घरे देण्याची योजना गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी जाहीर केली होती.

2007 मध्ये सायन प्रतिक्षानगरच्या म्हाडा कॉलनीतील घरांची त्यासाठी निवड करण्यात आली होती.

पण गृहमंत्रालयाने 2007 पासून याबद्दलची फाईल म्हाडाकडे पाठवलीच नाही.

close