रेल्वे भरतीत कोट्यवधींचा घोटाळा; सीबीआयचे छापे

June 18, 2010 10:26 AM0 commentsViews: 4

18 जून

रेल्वे भरतीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सीबीआयने दोन दिवसांपासून देशभरात छापे टाकले आहेत. या कारवाईत आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

यात मुंबई रेल्वे भरती बोर्डाच्या अध्यक्षांचा मुलगा विवेक भारद्वाज याचाही समावेश आहे. त्याच्याकडून 60 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

तर हैदराबाद आणि बंगळुरूमधील काही रेल्वे अधिकार्‍यांनाही अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.

या सगळ्या घोटाळ्यामागे एक रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रेल्वे भरती परीक्षेचा एक पेपर साडेतीन लाख रुपयांना विकला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

close