अनिल अंबानी गैरहजर

June 18, 2010 5:56 PM0 commentsViews: 5

18 जून

आरआयएल अर्थात रिलायन्स इंडस्ट्रीजची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईत झाली. पण अनिल अंबानींनी या बैठकीला हजेरी लावली नाही.

मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि आई कोकिलाबेन अंबानींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

गेले 7 महिने कंपनीसाठी चांगले ठरले असून गॅस वादामध्ये सुप्रीम कोर्टाचा आरआयएलच्या बाजूने लागलेला निर्णय कंपनीसाठी महत्त्वाचा असल्याचे मुकेश यांनी आपल्या भाषणात सांगितले.

सोबतच अनिल अंबानींच्या एडीएजी म्हणजेच अनिल धिरूभाई अंबानी ग्रुपसोबतचे संबंध चांगले करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कंपनीकडे अनेक विस्ताराच्या योजना असून यासाठी आपल्याकडे पुरेसे भांडवल असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तर गॅसप्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतरच एडीएजी गॅस देणार असल्याचेही मुकेश यांनी सांगितले.

आरआयएल येत्या काळात पॉलिएस्टर क्षेत्रात सगळ्यात जास्त गुंतवणूक करणार आहे.

close