भोपाळ पीडितांना मिळणार भरपाई

June 18, 2010 6:01 PM0 commentsViews: 3

18 जून

भोपाळ वायू पीडितांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आज चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगटाची बैठक झाली.

त्यात प्रामुख्याने भोपाळ वायू पीडितांना नुकसान भरपाई किती वाढवून द्यायची, यावर चर्चा झाली.

नियोजन आयोगाने त्यासाठी 982 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. पण त्याला अजून अंतिम मंजुरी मिळालेली नाही.

आता यापुढे प्रत्येक शनिवारी भोपाळच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मंत्रीगटाची बैठक होणार आहे.

या बैठकीत कायदेविषयक प्रश्नांवरही चर्चा केली जाणार आहे. प्रत्येक रविवारी त्या बैठकीची माहिती सर्वांना देण्यात येईल.

close