कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक

June 19, 2010 11:13 AM0 commentsViews: 2

19 जून

कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्ते दुरूस्त होत नसल्याचा निषेध करत शिवसेनेने आज महापालिकेवर धडक मोर्चा काढला. संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्नही केला.

कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने 220 कोटींचा रस्ते विकास प्रकल्प हाती घेतला आहे. पण नियोजनशून्य कारभारामुळे ऐन पावसाळ्यात कोल्हापूरकरांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत 49 किलोमीटरचे रस्ते 'बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा' या तत्वानुसार होत आहेत.

9 जानेवारी 2009 पासून या रस्त्याचे काम सुरू आहे. काम होऊन दीड वर्ष उलटले तरीही 26 किलोमीटर रस्त्यांचा पत्ताच नाही.

close