‘जैतापूर प्रकल्पाची जबरदस्ती नाही’

June 19, 2010 2:45 PM0 commentsViews: 3

19 जून

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कुणाच्याही दबावाखाली रेटणार नाही. कोकण बचाव आंदोलन समितीने मांडलेल्या तसेच कोकणवासियांच्या सर्व शंकाचे निरसन केले जाईल, असे पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.

ऍटोमिक एनर्जी कमिशन आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन या प्रश्नांमधे लक्ष घालतील.

एनव्हायरमेंटल ऍपरायजल कमिटीसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधीही दिली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

close