जुन्या नात्याचा नवा सिलसिला…

June 19, 2010 3:07 PM0 commentsViews: 6

19 जून

बॉलीवूडमध्ये प्रेमप्रकरणे नवी नाहीत. पण सर्वात जास्त गाजलेले प्रेमप्रकरण म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे…यामुळे अभिनेत्री जया बच्चन आणि रेखा यांच्यातील मैत्रीचा 'सिलसिला' कायमचा संपला.

पण आता याच दोघींमध्ये एक नवा 'सिलसिला' सुरू होत आहे. निमित्त ठरले, 'चेहरे' या गौतम राजाध्यक्षांच्या नव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचे…

यशराज निर्मित सिलसिला या सिनेमातील रंग बरसे हे गाणे तुफान हिट झालं… मात्र याच गाण्याच्या शूटिंगदरम्यान तीन जणांच्या आयुष्यात थोड्या फार फरकाने का होईना रंगाचा बेरंग झाला.. हे तिघे म्हणजे अभिनयाचा बादशहा अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा…

या सिनेमानंतर अमिताभ आणि रेखाच्या चुपके चुपके रोमान्सच्या बातम्या चर्चिल्या जाऊ लागल्या…मीडियासमोर जरी या तिघांनी या बातम्यांना नाकारले, तरी पाणी नक्कीच कुठे तरी मुरत होते हे नक्की…

इतकी वर्षे कुठल्या ना कुठल्या प्रकारे या रिलेशनविषयी चविष्ट चर्चा होत गेली… पण आता या सगळ्या चर्चांना एक नवीन वळण मिळाले आहे.

शुक्रवारी ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांच्या चेहरे या पुस्तकांचे प्रकाशन झाले. बॉलीवूडमधील अनेक नामवंत मंडळींप्रमाणे रेखा आणि जया बच्चन याही पाहुण्या म्हणून या कार्यक्रमात आल्या…यात जया व्यासपीठावर होत्या तर रेखा प्रेक्षागृहात….

पुस्तक प्रकाशन झाले आणि अचानक रेखा आणि जया समोरासमोर आल्या. आणि दोन जीवाभावाच्या मैत्रिणी भेटल्याप्रमाणे त्या एकमेकींना भेटल्या..दोन-तीन मिनिटे का होई या दोघींमध्ये संवाद झाला…

ही संधी मीडिया कशी सोडणार? कॅमेरे लखलखले…आणि जुनी नाती पुन्हा उजळून निघाली…

close