साबीर शेखला काँग्रेस पुन्हा पक्षात घेणार

June 21, 2010 12:11 PM0 commentsViews: 3

21 जून

धुळे दंगलीतील मुख्य आरोपी साबीर खान याला काँग्रेसमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. खान यांनी याबाबत प्रदेश काँग्रेसकडे अर्जही केला आहे.

2008 मध्ये धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी धुळ्यात मोठी धार्मिक दंगल पेटली होती. काँग्रेस नगरसेवक साबीर खान याला त्या दंगलीतील मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आले होते.

याबाबत 'आयबीएन-लोकमत'ने पाठपुरावा केल्यानंतर काँग्रेसने साबीर खानला पक्षातून काढून टाकले होते.

त्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून साबीर खानने तुरुंगातून निवडणूक लढवली होती. मात्र आता दोन वर्षानंतर पुन्हा साबीर खानला पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू झाली आहेत.

close