राज-उद्धव एकीसाठी कदमांचे साईबाबाला साकडे

June 21, 2010 12:19 PM0 commentsViews: 2

21 जून

सध्या शिवसेना-भाजप युतीमध्ये धुसफूस सुरू आहे. पण अशा वेळी शिवसेना नेते रामदास कदम यांचा मूड मात्र वेगळाच आहे. त्यांनी शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांना साकडे घातले आहे. राज आणि उद्धव यांना एकत्र येण्यासाठी..!

राज आणि उध्दव ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांना आनंद होईल. दोन्ही भाऊ एकत्र यावे यासाठी मी नवस केला आहे, असे कदम यांनी म्हटले आहे. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

शिवसेनाप्रमुखांची परवानगी घेतली का?

दरम्यान, रामदास कदम यांनी असे साकडे घालण्याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परवानगी घेतली आहे का? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते लातूरमध्ये बोलत होते.

close