भिवंडीत 21 गोदामे खाक

June 21, 2010 12:26 PM0 commentsViews: 14

21 जून

भिवंडीत वलगाव येथील पद्मावती कंम्पाऊंडमधील ओम साई गोदामाला आज आग लागली.

या गोदामात केमिकल असल्यामुळे आगीने उग्र रुप धारण केले होते. त्यात 21 गोदामे जळून खाक झाली.

पाऊस सुरू असल्याने आगीची तीव्रता कमी झाली. आग विझवण्यासाठी भिवंडी महापालिकेच्या 9 गाड्या, तर कल्याण, डोंबिवली ठाणे येथीलही फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोचल्या.

दरम्यान या गोदामात रसायन असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना दुसरीकडे हलवण्यात आले.

close