कुर्ला नेहरूनगरमध्ये भीतीचे सावट

June 21, 2010 12:36 PM0 commentsViews: 4

21 जून

गेल्या तीन महिन्यांत कुर्ला नेहरूनगर परिसरात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. हा हत्या करणारा गुन्हेगार अजूनही मोकाट आहे. त्यामुळे या भागात घबराटीचे वातावरण आहे.

आता तर शाळांनीही मुलांच्या सुरक्षेबाबत धसका घेतला आहे. सुरक्षेत वाढ करण्यात येत असली तरी पालकांनी मुलांना आपल्या जबाबदारीवर शाळेत आणावे, अशी सूचना आता शाळा विद्यार्थ्यांना करत आहेत.

तपासासाठी दोन टीम

या हत्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या दोन टीम सक्रीय असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली आहे. सहपोलीस कायदा आणि सुव्यवस्था तसेच गुन्हे विभागाच्या सहपोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. गुन्हेगार लवकरच हाती येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी आज नुसरत शेखच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गुन्हेगारांचा माग लागला असून पोलीस लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचतील, असा दावा यावेळी बागवे यांनी केला.

close