फीवाढी विरोधात मनसेची पुण्यात तोडफोड

June 21, 2010 1:20 PM0 commentsViews:

21 जून

पुण्यातील विमाननगर येथील रोझरी शाळेने केलेल्या फीवाढीविरोधात मनसेने आंदोलन करत तोडफोड केली होती.

अखेर आज पुण्याचे शिक्षण उपसंचालक सुनील मगर यांनी रोझरी शाळेला नोटीस पाठवून फीवाढ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

रोझरी शाळेमध्ये फी भरण्यासाठी पालकांना आज बोलावण्यात आले होते. मात्र इथे आल्यानंतर त्यांना शाळेने दर महिन्याला 300 रुपयांनी फी वाढ केल्याचे समजले.

त्यामुळं संतप्त झालेल्या पालकांनी एकत्र येत शाळेविरोधात हे आंदोलन केले.

close