नाशिक महापालिकेची ठेकेदारांवर मेहेरबानी

June 21, 2010 1:39 PM0 commentsViews: 2

21 जून

नाशिक महापालिकेच्या दिवाळखोर कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

बायो मेडिकल वेस्ट प्रोजेक्टच्या ठेकेदाराला महापालिकेने तब्बल 1 कोटी 35 लाख रुपये जास्त दिल्याचे नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी उघडकीस आणले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत लक्षवेधी मांडण्यात आली होती. इतकेच नाही तर स्थायी समितीची मंजुरी नसताना या कराराची मुदत वाढवण्यात आली आहे.

नेमक्या या चर्चेच्या वेळी पालिकेचे आरोग्य अधिकारी रजेवर गेले होते.

close