पोर्तुगालने डागले 7 गोल

June 21, 2010 2:06 PM0 commentsViews: 2

21 जून

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सगळ्यात एकतर्फी मॅच आज बघायला मिळाली. पोर्तुगाल टीमने उत्तर कोरिया टीमवर थोडेथोडके नाही तर 7 गोल डागले.

मॅचच्या पहिल्या हाफमध्ये पोर्तुगाल टीमने फक्त एक गोल केला होता. पण दुसर्‍या हाफमध्ये त्यांच्या आक्रमक फळीने चित्र एकदम पालटले.

कोरियन गोलपोस्टवर त्यांनी एकामागून एक हल्ले केले. त्यांच्या गोलचा प्रत्येक प्रयत्न यशस्वी झाला. टीमचा पहिला गोल मायरलीसने केला, तो 27व्या मिनिटाला.

पण दुसर्‍या हाफमध्ये गोलची मालिकाच सुरू झाली. फॉरवर्ड टियागो आणि रोनाल्डो त्यांच्या विजयाचे हीरो ठरले.

टियागोने दोन गोल केले. तर रोनाल्डोच्या नावावर गोल एकच असला तरी निदान चार गोलमध्ये त्याचा वाटा महत्त्वाचा होता. त्यालाच मॅन ऑफ मॅच किताब देण्यात आला.

close