प. बंगालमधील डाव्या आघाडीचा वर्धापन दिन

June 21, 2010 3:12 PM0 commentsViews: 4

21 जून

पश्चिम बंगालमधील डाव्यांच्या आघाडी सरकारला आज 33 वर्षे पूर्ण होत आहेत. सरकारचा हा 33 वर्धानपन दिन धडाक्यात साजरा केला जात आहे.

पुढच्या वर्षी बंगालमध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकांकडे आता डाव्यांचे लक्ष लागले आहे. पण नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत डाव्यांचा लाल गड कोसळला.

अल्पसंख्याकबहुल भागात डाव्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे अल्पसंख्यांकाकडे विशेष लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी व्यक्त केली आहे.

तसेच भूसंपादनासारखे संवेदनशील विषय काळजीपूर्वक हाताळायला हवेत, असही त्यांनी म्हटले आहे.

close