शिवसेनेचा मीडियावर हल्ला

June 22, 2010 9:56 AM0 commentsViews: 1

22 जून

मुंबईतील रिक्षा, टॅक्सीभाडेवाडीचे श्रेय घेण्यावरून आज शिवसेनेने पुन्हा एकदा मीडियावर हल्ला चढवला.

यात एनडीटीव्हीचे प्रसाद काथे जखमी झाले. तर 'आयबीएन-लोकमत'चे उदय जाधव, न्यूज 24चे विनोद जगदाळे, झी 24 तासचे अमित जोशी यांनाही शिवसेनेच्या टॅक्सी युनियनच्या पदाधिकार्‍यांनी धक्काबुक्की केली.

राज्य सरकारने कामगार युनियनची भाडेवाढीची मागणी मान्य केली. त्यानंतर टॅक्सीमेन युनियन्सचे अध्यक्ष क्वाड्रोस यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार गेले. त्यावेळी आमचीही प्रतिक्रिया घ्या, असे म्हणत कामगार सेनेच्या प्रतिनिधींनी पत्रकारांना जोरदार धक्काबुक्की केली.

यामुळे मीडियावर हल्ला करण्याची शिवसेनेची कार्यपद्धत पुन्हा एकदा समोर आली आहे.

close