औरंगाबादमध्ये हल्लासत्र सुरूच

June 22, 2010 10:14 AM0 commentsViews: 4

22 जून

औरंगाबादमध्ये सेना भाजप वादातून सुरू झालेले हल्लासत्र अजूनही सुरूच आहे. शिवसेनेचे औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या गाडीवर आज हल्ला करण्यात आला.

काही अज्ञात लोकांनी दानवे यांची गाडी फोडली. गेल्या चार दिवसांपासून, औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीत तणाव सुरू आहे.

कालपर्यंत काही भाजपच्या नेत्यांवरही हल्ले झाले होते. तसेच काल काँग्रेसचे राठोड यांच्यावर हल्ला झाला होता.

close