तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या 6 नगरसेवकांना जामीन

June 22, 2010 10:23 AM0 commentsViews: 1

22 जून

औरंगाबाद महापालिकेतील तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांना जामीन मिळाला आहे. 15 हजार रुपयांच्या बाँडवर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

हे सहा नगरसेवक आज शरण आले. शरण आलेल्यांमध्ये विकास जैन, राजू वैद्य, जगदीश सिद्द, विजय वाकचौरे, सूर्यकांत जायभाये हे नगरसेवक आहेत. तोडफोडप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या तोडफोडप्रकरणी शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या अटकपूर्व जामीनावर 24 तारखेला सुनावणी होणार आहे.

close