खरा रावण कोण?

June 22, 2010 11:01 AM0 commentsViews: 2

22 जून

रावण सिनेमा रिलीज झाला आणि रिलीजनंतर सुरू झाली एक काँट्रोव्हर्सी.. 80 फुटांवरून अभिषेक बच्चनने नदीत मारलेली उडी खरोखर कुणी मारली, यावर सध्या चर्चा सुरू आहे..

मणिरत्नमच्या रावणची सुरुवात होते, ती बिराच्या 80 फुटांवरून मारलेल्या उडीवरून.. ही उडी नक्की कुणी मारली, यावरून वाद सुरू झाला आहे. अभिषेक बच्चनवर हा शॉट शूट झाला असला तरीही हा श्वास रोखून लावणारा स्टंट केला होता, बंगलोरच्या डायव्हिंग चँपियन एम. एस. बलरामने..

पण अभिषेक म्हणतो, मला खूप उंचीवरून उडी मारायची होती. मी ती मारलीही. पण सेफेस्ट साइड म्हणून मणिरत्नमनं चँपियनकडून उडी मारून घेतली…

पण हिंदी रावण आणि तामीळ रावणममध्ये एकच शॉट आहे. आणि तो एकाच व्यक्तीने केल्याचे स्पष्ट दिसत आहे.बलरामचंेक्रेडिट स्वत:कडे घेतल्याबद्दल स्टार्सवर टीका होत आहे. पण अगदी हॉलिवूडमधीलही अगदी थोडे कलाकार स्टंटचे वास्तव रिलीजआधी सगळ्यांसमोर आणतात.

भारतात बॉक्स ऑफिसवर रावणचे कलेक्शन फार कमी झाले आहे. आणि आता या स्टंट काँट्रोव्हर्सीबद्दल बिग बीनेही ट्विटरवर लिहिले आहे. बिग बीने एडिटिंगवर टीका केली आहे.

तो लिहितो, '' हे दुदैर्वी आहे. एडिटिंगमध्ये तुम्ही फक्त वैचारिक प्रक्रियेचे ठराविक अंश पाहू शकता. त्यामुळे त्यात सुसूत्रता राहत नाही. एडिटिंगमध्ये मुख्य शॉट्स उडवले गेले. त्यामुळे बिराची गोंधळलेली प्रतिमा समोर आली. समजत नाही असं का झालं ते?''

ही काँट्रोव्हर्सी थोडा वेळ बाजूला ठेवूया. पण सध्या मणिरत्नमसमोर एकच मोठा प्रश्न आहे. तो म्हणजे बॉक्स ऑफिसवर रावणाचे स्वागत काही झाले नाही हा…

close