शेवटची लीग मॅच भारत-श्रीलंकेत

June 22, 2010 11:07 AM0 commentsViews: 3

22 जून

एशिया कप स्पर्धेत आज भारत आणि यजमान श्रीलंकादरम्यान शेवटची लीग मॅच रंगणार आहे. श्रीलंकेने टॉस जिंकत पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण पहिली बॅटींग करणार्‍या भारताची सुरुवात मात्र खराब झाली.

सेहवागच्या जागी संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने गौतम गंभीरसोबत सावध सुरुवात केली. पण गंभीर काही जास्त वेळ टिकू शकला नाही. 23 रन्सवर मॅथ्थुजने त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला महारुफने लगेचच आऊट केले. तर लागोपाठच्याच ओव्हरमध्ये हेराथने दिनेश कार्तिकलाही आऊट करत भारताला तिसरा धक्का दिला.

दिनेश कार्तिकने 40 रन्स केले. गुरुवारी होणार्‍या स्पर्धेच्या फायनलची रंगीत तालिम म्हणून या मॅचकडे पाहिले जात आहे.

close