मुंबईत बगाड फोटो प्रदर्शन

June 22, 2010 11:25 AM0 commentsViews: 44

22 जून

मुंबईतील फोर्टमध्ये फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियात सध्या बगाड फोटो प्रदर्शन सुरू आहे.

सनी निकम आणि संदिप वाईरकर या तरुण फोटोग्राफर्सनी वाई गावातील 800 वर्षांची बगाड संस्कृती कॅमेर्‍यात टिपली आहे.

रंगपंचमीच्या दुसर्‍या दिवशी सुरू होणारा बगाड उत्सव 5 दिवस चालतो. बगाड परंपरेचा अभ्यास करण्यासाठी या फोटोग्राफर्सनी वाईत राहून अभ्यास केला.

बगाडची तयारी, उत्सव आणि वाईतील गावकरी, तसेच जुन्या देवळांचे फोटोही या प्रदर्शनात पाहायला मिळतात.

बगाड उत्सवातील मनोरंजक गोष्टी पाहण्यासाठी हे प्रदर्शन 24 जूनपर्यंत खुले आहे.

close