खरेदीअभावी नाशिकमध्ये कांदा सडला

June 22, 2010 11:35 AM0 commentsViews: 2

22 जून

लेव्ही प्रश्नी व्यापार्‍यांनी खरेदी बंद केल्याने नाशिक जिल्ह्यात कांदा सडायला सुरुवात झाली आहे.

वणीतील व्यापार्‍यांवर महसूल विभागाने केलेल्या कारवाईचे निमित्त झाले आणि सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील खरेदी विक्री व्यापार्‍यांनी बंद पाडली. व्यापार्‍यांच्या बंदचा आज तिसरा दिवस आहे.

या बंदचा कांद्यासारख्या नाशवंत पिकावर मोठा परिणाम झाला आहे. शेतकर्‍याचा कांदा सडू लागला आहे. तो शेतात पुरण्यावाचून त्याला गत्यंतर राहिलेले नाही.

कधी माथाडी कामगारांच्या, तर कधी व्यापार्‍यांच्या संपामुळे शेतकर्‍याचे अतोनात नुकसान होते. यातून कायम स्वरूपी मार्ग काढण्यात पणन खात्याला अपयश येत आहे.

close