पुण्यात शाळेचे बेकायदा बांधकाम

June 22, 2010 12:13 PM0 commentsViews: 4

22 जून

पुण्यातील वारजे माळवाडी भागात बिल्डरची दादागिरी सुरू असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. येथील गिरीश सोसायटीच्या ओपन स्पेसवर बिल्डर शानू पटेल यांनी बेकायदेशीरपणे शाळा बांधल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

पुणे महापालिकेने बांधकाम पाडण्याचा आदेश देऊनही कारवाई होत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. बिल्डर शानू पटेल यांनी मात्र शाळेचे बांधकाम कायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

गिरीश सोसायटीच्या 3 हजार 192 स्क्वेअर फूट मोकळ्या जागेवर सोसायटीचे तत्कालीन चेअरमन शानू पटेल यांनी हायस्कूल बांधले. सोसायटीमधे 70 बंगले आहेत. बिल्डरने 7-12 चा उतारा नसताना खोटी कागदपत्रे सादर करून जागेचा बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा रहिवाशांचा दावा आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुण्यातील बेकायदा ओपन स्पेसवरील बेकायदा बांधकामाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

close