सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून

June 22, 2010 12:21 PM0 commentsViews: 2

22 जून

नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील बेडग गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका बिहारी तरुणाला अटक केली आहे.

दरम्यान संतप्त जमावाने या बिहारी तरुणाच्या घरावर दगडफेक केली आहे. मिरज तालुक्यातील बेडग येथीलअश्विनी शिरसाट ही मुलगी कालपासून बेपत्ता होती. शाळेतून घरी परत न आल्याने तिच्या आई वडिलांनी शोध सुरू केला.

मंगसुरी रोड येथील शेतात तिचे दप्तर सापडले. तर तिचा मृतदेह जवळच्या विहिरीत सापडला.

बेडग येथील बाळकृष्ण हॅजरीज इथे काम करणार्‍या राजू जगदीश पासवान या बिहारी तरुणाने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close