मिरज दंगल प्रकरणी पाचजणांना अटक

June 22, 2010 12:28 PM0 commentsViews: 147

22 जून

मिरज दंगल प्रकरणी यासिर सौदागरसह पाच जणांना 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

यासिर हा माजी नगरसेवकाचा मुलगा आहे. हिंदू एकताची कमान फाडणे, पोलिसांवर दगडफेक, मूर्तीची विटंबना करणे, दंगलीला प्रोत्साहन देणे, यांसारखे गुन्हे त्याच्यावर आहेत.

दंगलीच्या काळात मुलांना एकत्र जमवून दंगल भडकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

तसेच अमोल भानुदास भोसले याला गुन्हा क्रमांक 142 अंतर्गत अटक केली आहे. त्याच्यावर जमावाला चिथावणी देणे, दगडफेक, घरे आणि सरकारी वाहनांची नासधूस यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

close