नागपुरात महावितरणच्या अधिकार्‍याला काळे फासले

June 22, 2010 12:40 PM0 commentsViews: 5

22 जून

नागपूरमध्ये महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. ग्रामीण भागात वीजेचे खांब उभारले जात आहेत.

मात्र यासाठी अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. अनेक ठिकाणी काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे.

या विरोधात अनेकदा तक्रार करुनही काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट महावितरणच्या ऑफीसमध्ये जाऊन कार्यकारी अभियंता सचिन पालेवाल यांना काळे फासले.

close