अकरावी प्रवेशासाठी आणखी एक दिवस…

June 22, 2010 12:50 PM0 commentsViews:

22 जून

दहावी पास होऊन अकरावी प्रवेशाची वाट पाहणार्‍या विद्यार्थ्यांना आता आणखी एक दिवस वाट पहावी लागणार आहे.

बेस्ट फाईव्हच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवरील निर्णय मुंबई हायकोर्ट उद्या सकाळी 11 वाजता करणार आहे.

आज कोर्टाने याचिकाकर्ते आणि राज्यसरकार अशी दोघांची बाजू ऐकून घेतली.

अकरावी प्रवेशासाठी राज्य सरकारने घेतलेल्या बेस्ट फाईव्ह फॉर्म्युलाला आयसीएसई बोर्डाच्या 21 पालकांनी मिळून मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे.

याचिकेवर निर्णय होईपर्यंत हायकोर्टाने अकरावी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.

close