11वी प्रवेश जुन्याच पद्धतीने

June 23, 2010 10:08 AM0 commentsViews: 5

23 जून

बेस्ट फाइव्हचा निकाल अखेर लागला आहे. मुंबई हाय कोर्टाने राज्य सरकारचा हा निर्णयच रद्दबातल ठरवला आहे.

बेस्ट फाईव्ह मुळे घटनेच्या 14ल्या कलमाचे उद्घाटन होत असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या पाच विषयांतील गुणांच्या आधारे वरच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण काही आयसीएसईच्या काही पालकांनी याला विरोध करत हायकोर्टात दाद मागितली होती.

यावर कोर्टाने हा निकाल दिला. त्यामुळे राज्य सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. काहीही झाले तरी बेस्ट फाईव्ह आणणारच, असे राज्य सरकारने सांगितले होते. त्याविरुद्ध आयसीएसई बोर्डातील पालक कोर्टात गेले होते.

आता यामुळे पुन्हा नवीन पेच निर्माण होणार असून, जुन्याच फॉर्मुल्यानुसार 11 वीचे प्रवेश घ्यावे लागणार आहेत.

दरम्यान बेस्ट फाईव्ह संदर्भातील कोर्टाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ, असे शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

close