शिक्षण सेवक भरती नियमानुसारच होणार

June 23, 2010 10:23 AM0 commentsViews: 27

23 जून

शिक्षण सेवकांची भरती नियमानुसारच केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

तालुका आणि जिल्हा स्तरावर भरतीबाबत निर्णय घेता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण सेवकपदांसाठी मुलाखतीस आलेल्या इतर जिल्ह्यांतील शेकडो डी.एड. उमेदवारांना सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि शिवसेनेच्या पदधिकार्‍यांनी धक्काबुक्की करून पळवून लावले.

भाजप आणि सेनेच्या या आंदोलनानंतर सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेतील पदाधिकार्‍यांनी ही मुलाखत प्रकिया स्थगित करण्याची मागणी लावून धरली होती.

तसेच नारायण राणे यांनीही इतर जिल्ह्यातील उमेदवारांची कोकणात नियुक्ती करण्यास विरोध केला होता.

close