महिला पुजार्‍याच्या नेमणुकीची मागणी

June 23, 2010 2:19 PM0 commentsViews: 5

23 जून

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यक्षेत्रातील स्री देवता मंदिरातील पुरुष पुजार्‍यांना हटवून महिला पुजार्‍यांची नियुक्ती करा, अशी मागणी ब्लॅक पँथरच्या महिलांनी केली आहे.

या मागणीसाठी आज ब्लॅक पँथरच्या महिलांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात निदर्शन केली.

तसेच याबाबत तत्काळ अमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

close