रायगडमध्ये शेतकर्‍यांचा रास्ता रोको

June 23, 2010 2:24 PM0 commentsViews: 1

23 जून

खारबंदीची दुरुस्ती आणि खताच्या टंचाईच्या प्रश्नाबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज रायगड जिल्ह्यात पेण इथे मुंबई – गोवा महामार्गावर रास्ता रोको केले.

खारबंदी फुटून येथील शेतकर्‍यांच्या शेतजमिनींचे नुकसान होत आहे. सरकारने यासाठी अपुरा निधी देऊन या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.

तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खत टंचाई निर्माण झाली आहे, या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला.

close