पहिल्या सैनिक शाळेचा सुवर्णमहोत्सव

June 23, 2010 2:41 PM0 commentsViews: 7

23 जून

देशातील पहिली सैनिकी शाळा असलेल्या सातारा सैनिक शाळेने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.

या शाळेने आजवर अनेक लष्करी अधिकारी घडवले आहेत. सध्या देशात एकूण 24 सैनिकी शाळा आहेत. या सैनिकी शाळांची सुरुवात सातार्‍यातील सैनिक शाळेपासून प्रेरणा घेत झाली आहे.

तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून 23 जून 1961मध्ये या शाळेची स्थापना करण्यात आली.

शाळेत शिक्षण घेऊन सैन्यात दाखल झाल्यानंतर अनेक वीरांनी भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली आहे.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित अनेक उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य कर्नल सतिश चर्तुवेदी यांनी दिली. तसेच येत्या ऑक्टोबर महिन्यात सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राष्ट्रपती प्रतिभा पाटील उपस्थित रहाणार आहेत.

close