उदयन राजेंचा अजित पवारांना टोला

June 23, 2010 2:59 PM0 commentsViews: 82

23 जून

नाराज राष्ट्रवादीचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आता अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात लक्ष घातले आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील सरकारी जमिनी कुणाला दिल्या, बेघर-भूमिहिनांना जमिनी न देता कमर्शियल कॉंम्प्लेक्स कशी उभारली असे सवाल उदयनराजेंनी विचारले आहेत.

वढू तुळापूर येथील संभाव्य कचरा प्रोसेसिंग प्रकल्पावरून उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात जुंपली होती. अजित पवारांनी बाहेरच्यांनी शहाणपण शिकवू नये, असा टोला मारला होता.

त्यावर चिल्लर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे उदयन राजे म्हणाले आहेत.

close