अफझल गुरूची याचिका गृहमंत्रालयाने फेटाळली

June 23, 2010 3:06 PM0 commentsViews: 7

23 जून

संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूची दयेची याचिका गृहमंत्रालयाने फेटाळली आहे.

केंद्र सरकारने अफजल गुरूची फाईल पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवली आहे. अफजल गुरूवर दया दाखवण्यात येऊ नये, अशी शिफारस सरकारने राष्ट्रपतींना केली आहे.

संसदेवरील हल्ला प्रकरणी, अफझलला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याची पत्नी तबस्सुमने फाशी रद्द व्हावी म्हणून, राष्ट्रपतींकडे दयेची याचिका दाखल केली होती.

close